क्षितिज गुरुकुल बुरुंगवाडी छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त शिव सप्ताहातील प्रथम पुष्प अर्पण कार्यक्रम उत्साहात संपन्न

Admin

"उत्सव हिंदवी स्वराज्याचा आभाळी आज सजला नतमस्तक मी शिवरायांच्या चरणी ज्यांनी महाराष्ट्र घडविला ज्यांनी लिहिली स्वराज्याची आणि पराक्रमाची गाथा त्या शिवरायांच्या चरणी ठेवीतो माथा "
            सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज बुरुंगवाडी.

              

आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वि जयंती क्षितिज गुरुकुल मध्ये शिवजन्मोत्सव सप्ताहातील आज पहिले पुष्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केले आजच्या या कार्यक्रमात निवासी संकुलातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक श्री सुनील (बापू )जाधव , संस्थेच्या कार्यवाह सौ वनिता (काकी) जाधव,चिरंजीव विश्वराज जाधव सर हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास लाभले 



     त्याचबरोबर प्राचार्या पाटील मॅडम. पी .एम .जाधव सर कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तिपूजनाने व महाराष्ट्र राज्य गीताने झाली इयत्ता पाचवी ते नववी मधील काही विद्यार्थ्यांनी शिवजन्म व त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा आपल्या मनोगत मधून व्यक्त केला जसे की शिवजन्म , सुरतेची लूट, पन्हाळगडचा वेढा, आदिलशाही सल्तनत, निजामशाही यांच्याशी झालेला संघर्ष, दक्षिण दिग्विजय महाराजांचा मृत्यू, व उत्तर अधिकारी या सर्व टप्प्यांमधून महाराजांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून सांगितला . शिवरायांची आरती घेण्यात आली व  सिंहगर्जनेने शिवजन्म प्रथम पुष्प अर्पण कार्यक्रम संपन्न झाला. 







                                      🚩 *जय भवानी जय शिवराय🚩