रक्षाबंधन - बंध रेशमाचे

Admin

 

सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड जुनिअर कॉलेज बुरुंगवाडी येथे  गुरुवारी  निवासी संकुलाचा रक्षाबंधन - बंध रेशमाचे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.


                    सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड जुनिअर कॉलेज बुरुंगवाडी येथे  गुरुवारी  निवासी संकुलाचा रक्षाबंधन - बंध रेशमाचे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. भाऊ बहिणीच्या नात्याची घट्ट वीण म्हणजे रक्षाबंधन या कार्यक्रमासाठी माननीय श्री शांतिनाथ रामचंद्र मांगले प्रसिद्ध साहित्यिक बलवडी. हे उपस्थित होते.


          त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय श्री एम.टी.देसाई सर राष्ट्रीय व्हॉलीबॉल  प्रशिक्षक यांनी भूषवले. या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष श्री सुनील (बापू) जाधव. यांनी बोलताना भावा बहिणींच्या नात्याचे महत्त्व सांगितले. त्याचबरोबर संस्थेच्या कार्यवाह सौ. वनिता (काकी ) जाधव  यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

 या कार्यक्रमाची सुरुवात ११. ३0 वाजता झाली. प्रमुख पाहुण्यांनी स्वजीवनावर रचित एक विनोदी कथा सांगत सर्वांचे उद्बोधन पर मनोरंजन केले. कार्यक्रमास श्री बी.पी. जाधव सर, श्री रवि राजमाने सर, श्री रमेश हजारे सर, श्री. आनंदा  उतळे  सर   माननीय श्री गौस मोहम्मद लांडगे सर यांचीही अनमोल उपस्थिती  लाभली. मुख्याध्यापिका सौ. डी. एस.जाधव मॅडम यांचेही मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य सौ  एस. ए.  पाटील मॅडम यांनी स्वागत प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, सौ मगदूम मॅडम व सौ भंडारे मॅडम यांनी केले तसेच शिक्षक मनोगत व्ही एस पाटील सरांनी केले.औपचारिक कार्यक्रमाचे आभार श्री पी आर पाटील सर यांनी मानले. यानंतर कराओके गाण्यांचा आस्वाद घेत मुलांच्या रक्षाबंधन ओवाळणी कार्यक्रमाची सुरुवात झाली. बहिणींसाठी संगीत खुर्ची हा खेळ घेण्यात आला. बक्षीस वाटपानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.